सीमाभागात मराठी टिकली केवळ समितीमुळेच असा टोला मध्यवर्ती समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी राष्ट्रीय पक्षात गेलेल्या मराठी कार्यकर्त्यांना टोला लगावला आहे. ते आमदार अरविंद पाटील यांच्या नेतृत्वात खानापूर तालुक्यातील जांबोटी येथे महाराष्ट्र एकीकरण समितीचा विभागीय मेळावा आणि सीमा सत्याग्रहींच्या सत्कार कार्यक्रमात बोलत होते.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जांबोटी येथील जेष्ठ सीमा सत्याग्रही शंकर बाबुराव देसाई होते.यावेळी मध्यवर्ती समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, मध्यवर्ती खजिनदार प्रकाश मरगाळे, राजेंद्र मुतगेकर,शिव संत संजय मोरे,दत्ता उघाडे, महेश जुवेकर विकास कलघटगी, खानापूरचे जगन्नाथ बिरजे,खानापूर तालुक्यातील जिल्हा पंचायत,तालुका पंचायत आणि ए पी एम सी सदस्य आदी उपस्थित होते.
जाहलो आम्हास भाग्य बोलतो मराठी ऐकतो खरेची धन्य जाहलो मराठी या मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने म्हटलेले कुसुमाग्रज यांच वाक्य समितीच्या कार्यकर्त्यांनी बेळगावातील मराठी टिकवून समितीने काय केलं ते दाखवून ते दाखवून दिलं आहे. राष्ट्रीय पक्षात सामील झालेल्या मराठी कार्यकर्त्यांना सीमाभागात मराठीवर झालेला अन्याय दिसत नाही का असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.
निवडणूक जवळ आली की राष्ट्रीय पक्षातील नेत्यांना शिवाजी महाराज त्यांचे पोवाडे आणि भगवं झेंडा आठवतो मात्र बेळगावात मराठीची गळचेपी होते तेंव्हा ते का गप्प असतात?या भागातील भाषा लिपी संस्कृती समितीच्या नेतृत्वात काम करणाऱ्या सीमा सत्याग्रहीनी टिकवलाय ही अभिमानाची गोष्ट आहे. मराठी टिकवण्यासाठी सत्याग्रहींच योगदान भावी पिढीसाठी आहे या योगदान मुळेच मराठीपण टिकणार आहे असेही ते म्हणाले.
यावेळी जांबोटी भागातील सीमा सत्याग्रहींचा सत्कार करण्यात आला. तीन हजार हुन अधिक मराठी भाषिक कार्यकर्ते मेळाव्यास उपस्थित होते.