जगात सर्वत्र शिवरायांना मान मिळतो मात्र बस्तवाड सारख्या गावात काही लोक शिवरायांच्या पुतळयाला विरोध करत आहेत ज्यांनी बारा बलुतेदारांना एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना केली त्यांच्या पुतळयाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा तीव्र शब्दात निषेध करण्याचा एकुमुखी ठराव बेळगुंदी येथील मेळाव्यात करण्यात आला.
तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने जन जागृतीसाठी मेळाव्याचे आयोजन केले होते या मेळाव्यात बस्तवाड गावात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास विरोध करणाऱ्या प्रवृतींचा निषेध करण्यात आला. याव मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सदस्य धैर्यशील पाटील,माजी आमदार मनोहर किणेकर,मध्यवर्ती खजिनदार प्रकाश मरगाळे,जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील, माधुरी हेगडे,माजी जिल्हा पंचायत सदस्या प्रेम मोरे,युवा आघाडीचे शाम पाटील व्यासपीठावर होते.
शिवरायांच्या काळात जीवाला जीव देणारी माणस होती म्हणून महाराजांनी स्वराजाची बांधणी केली बेळगावातील मराठी माणूस देखील स्वराज्या प्रमाणेच समिती साठी काम करतो आहे त्यामुळेच हा लढा स्वाभिमानाने पुढे तेवत ठेवा असा सल्ला धैर्यशील माने यांनी दिला.बेळगुंदी येथील मेळाव्यास समितीनिष्ट प्रचंड गर्दी केली होती. राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांनी दिलेली लवकरच साडी फाटली आणि कुकर फुटला असल्याची टीका देखील समिती नेत्या कडून यावेळी करण्यात आली.