Thursday, November 28, 2024

/

भिडे गुरुजींवर पुन्हा बेळगाव जिल्हा बंदी

 belgaum

शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांना बेळगाव जिल्हा बंदी करण्याचा आदेश जिल्हाधिकारी एन जिया उल्ला यानी बजावला आहे.

bhide guruji
धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मासा निमित्य हिंदू जनजागरण समितीच्या वतीने चिकोडी येथील के सी रोड वरील कमाते मैदानावार उद्या बुधवारी २८ फेब्रुवारी सायंकाळी पाच वाजता त्यांच्या जाहीर सभेच आयोजन करण्यात आले होते या सभेस जिल्हा पोलीस प्रमुखांच्या अहवाला वरून जिल्हाधिकाऱ्यानी हा जिल्हा बंदीचा आदेश बजावला आहे.
दलित संघटनांची निदर्शन होऊ शकतात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते अस कारण देऊन भिडे यांना बेळगाव जिल्हा बंदी करण्यात आली आहे२८ फेब्रुवारी ते ७ मार्च पर्यंत ही बंदी असणार आहे. मागील महिन्यात बेळगाव शहरात देखील त्यांची सभा आयोजित करण्यात आली होती त्यास देखील बेळगाव पोलिसांनी परवानगी नाकारली होती अट चिकोडीतील सभेस देखील त्यांना येनास बंदी घालण्यातआली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.