मराठी भाषेची उत्पत्ती बाविशे वर्षे पूर्वीची आहे याचे अनेक दाखले आहेत त्यामुळे मराठी अभिजात भाषाच आहे असे मत जेष्ठ विचारवंत,साहित्यिक प्रा हरी नरके यांनी मांडले. बेळगाव येथील वि गो साठे मराठी प्रबोधिनीच्या वतीने कविवर्य कुसमाग्रज यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधून मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना मांडले.
दीप प्रज्वलन करून माजी आमदार मनोहर किणेकर यांनी उद्घाटन केल तर कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी साठे प्रबोधिनीचे जयंत नार्वेकर होते.यावेळी सुभाष ओउळ्कर, मालोजी अष्टेकर .अशोक याळगी,नेताजी जाधव आदी उपस्थित होते.मराठीसाठी दिलेल्या योगदाना बद्दल जेष्ठ पत्रकार अशोक याळगी यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
हॉवर्ड युनिवर्ससिटी च्या अभ्यासकांनी सुद्धा मराठी भाषेची उत्पत्ती संस्कृत मधून झाली याशिवाय नानेघाटातील ब्राह्मी भाषेतील लिखाणात मराठीचा उल्लेख प्राचीन दाखला आहेत त्यामुळे मराठी ही एक स्वतंत्र अभिजात भाषा असल्याचे मत त्यांनी अनेक उदाहरण देऊन पटवून दिली. प्रत्येक मराठी भाषिकास मराठी भाषेचा गर्व असलाच पाहिजे श्रीलंके सारख्या ठिकाणी देखील मराठीचे अस्तित्व असल्याचे पुरावे मिळालेत त्यामुळे जागतिक स्तरावर मराठी पोहोचली आहे अस देखील त्यांनी स्पष्ट केल.
प्रत्येक मराठी माणसाने मराठीवर प्रेम केल पाहिजेत उत्तम पद्धतीचे मराठी प्राथमिक शिक्षण विध्यार्थ्यांना दिले पाहिजेत मराठीची ग्रंथालये समृद्ध केली पाहिजेत जागतिक दर्जाचे १०० हून अधिक ग्रंथ मराठीत आहेत त्यांना अनुदान देऊन अत्यल्प किंमतीत ते प्रत्येक मारही घरात ग्रंथ पोहोचले पाहिजेत प्रत्येकाने किमान आपली स्वाक्षरी तरी मराठीत केली पाहिजे असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला.
मराठी ही टी आर पी देणारी भाषा झाली आहे मराठी सिनेमे बॉलीवूड नाही तर हॉलीवूड मध्ये देखील पोचलेत त्यामुळे मराठीचा डंका जगभर दिसतोय प्रत्येक देशाला राष्ट्रगीत आहे तास विश्वगीत हे मराठीत आहे असेही ते म्हणाले. प्रसाद सावंत, मालोजी अष्टेकर,गजानन सावंत बी बी शिंदे आदी यावेळी उपस्थित होते .