धारवाड रोड येथे बांधण्यात येत असलेल्या रेल्वे ओव्हरब्रिज चे काम पूर्णत्वाकडे आले आहे. २४ जानेवारी २०१७ पासून सुरू झालेले हे काम आता लवकरच पूर्ण होऊ शकेल.
एलसी क्र ३८८ नावाने ओळखल्या जाणाऱ्या ब्रिज कामाचे कंत्राट केपीआर कॉन्स्ट्रक्शन या हैद्राबाद च्या कंपनीस देण्यात आले आहे. एकूण १४ पिलर असलेले हे ब्रिज आहे, यापैकी १० पिलर रुपाली हॉल पर्यंत आणि ४ जिजामाता चौकाकडे घालण्यात आले आहेत. ४० फूट रुंद ब्रिजच्या उभारणीत खर्च २४ कोटी पर्यंत येऊ शकतो.
कंत्राटदाराला निविदेप्रमाणे जुलै २०१८ पर्यंत काम पूर्ण करण्यास अवधी आहे. पण निर्धारित वेळे पूर्वीच म्हणजे मार्च महिन्यातच हे काम पूर्ण होईल. त्यानंतर रंगकाम, फिनिशिंग सारखी उरलेली कामे करणार आहेत.