पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या माजी मुख्यमंत्री येडीयुराप्पासह चार मंत्र्यांना सोबत घेऊन कर्नाटकात दौरा करीत आहेत आणि भ्रष्टाचार संपुष्टात आणण्याच्या गोष्टी करू लागले असल्याची टीका कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.
बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथे जन आशीर्वाद कार्यक्रमा अंतर्गत जाहीर सभेत ते बोलत होते. मोदी यांनी नोट बंदी करून देशाच्या गोर गरीब जनतेला बँकांच्या रांगेत उभे केले तर दुसरीकडे बँकाच्या मागील दरवाजाने आपल्या मर्जीतील लोकांचा काळा पैसा पांढरा करण्यास मोलाची मदत केली असल्याचा देखील त्यांनी आरोप केला.
नोट बंदीने गरीब जनतेचे बँकेत जमा झालेले २२ हजार कोटी रुपयांचा डल्ला मारून निरव मोदी देश सोडून फरार झाले आहेत यावर केंद्र सरकार आणि मोदी भाष्य करत तयार नाहीत हे काय गौड बंगाल असल्याचा देखील त्यांनी सवाल केला. रफेल युद्ध विमान खरेदी करण्याचा करार रातोरात बदलला याची कल्पना संरक्षण मंत्र्यांना देखील नव्हती त्यावेळी संरक्षण मंत्री गोव्यात मासे खरेदी करण्यात मग्न होते अस देखील ते म्हणाले. चार वर्षात पंत प्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वासने दिलेत त्याची पूर्तता केली गेली नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.