गेले दोन दिवस उत्तर कर्नाटकच्या दौऱ्यावर असलेले कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तर चार शक्तीपीठा पैकी एक असलेल्या सौंदती येथील रेणुका देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद मागितला.
गेले दोन दिवस राहुल गांधी अथणी बागलकोट आणि विजापूर आणि बेळगाव जिल्हा दौऱ्यावर आले होते सोमवारी सायंकाळी सौंदत्ती येथे जाऊन त्यांनी रेणुका देवीचे दर्शन घेऊन आगामी निवडणुकीत कॉंग्रेसला यश मिळू देत अशी प्रार्थना केली. बागलकोट हून विशेष हेलिकॅप्टर ने गोडचीला आले तिथून कारने सौंदत्तीला रवाना झाले.
यावेळी त्यांच्या सोबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उर्जा मंत्री डी के शिव कुमार,प्रदेशाध्यक्ष जी परमेश्वर प्रभारी के सी वेणुगोपाल,महिला कॉंग्रेस अध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर आदी उपस्थित होते.
जे जे राजकीय नेते रेणुका देवीच्या दर्शनाला सौदंती डोंगरावर हेलीकॅप्टर ने गेले त्यांच पद गमवावा लागलं अशी आख्यायिका आहे त्यामुळे राहुल गांधी यांना रोड मार्गे कार मधूनच सौन्दत्ती यलम्मा देवीला जाणायचा सल्ला स्थानिक काँग्रेस नेत्यांनी दिला. ज्यावेळी माजी पंत प्रधान एच डी देवेगौडा देवीच्या दर्शनाला हेलिकॅप्टर ने गेले तेंव्हा त्यांना पदा पासून दूर व्हावे लागले होते म्हणूनच सोमवारी राहुल गांधी यांनी हेलीकॅप्टर ऐवजी कारने जाऊन दर्शन घेणे पसंत केले.