कर्नाटकात विधानसभा निवडणुका जस जश्या जवळ येत आहेत तश्या श्री राम सेनेचे राज्याध्यक्ष प्रमोद मुतालिक सक्रिय राजकारणात प्रवेश करताहेत.भाजपकडून तिकीट मिळण्याची आशा संपुष्टात आल्या वर मुतालिक यांनी शिवसेने बरोबर युती करण्याची तयारी चालवली आहे.
कर्नाटकात श्री राम सेना शिवसेना युती निश्चित करण्यात आली असून कमिटी देखील नेमण्यात आली आहे सद्य स्थितीत 52 जागांवर विधानसभा लढवण्याचे ठरवण्यात आले आहे. शृंगेरी किंवा तेरदाळ मधून निवडणूक लढवण्याची तयारी प्रमोद मुतालिक यांनी केली आहे.
भाजप ढोंगी राजकारण करत असल्याचा आरोप करत हिंदुत्वां साठी काम करणारा मी चालत नाही मात्र एस एम कृष्णा कसा चालतो असा प्रश्न प्रमोद मुतालिक यांनी उपस्थित केला आहे. यावर भाजपने उत्तर देण्याचं आवाहन देखील मुतालिक यांनी केलं आहे
न्यूज सोर्स-वेब कन्नड