‘एक सीमा वासीय लाख सीमा वासीय’ या घोषणे प्रमाणे एक लाख सीमावासीय शरद पवारांच्या ३१ मार्च बेळगावातील सभेची तयारी मराठा क्रांती मोर्चाच्या पाश्वभूमीवर करू आणि सभा यशस्वी कार्य असा दृढ निर्धार मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
आगामी ३१ मार्च पर्यंत दर रविवारी बैठक घेऊन मराठा क्रांती मोर्चाच्या धर्तीवर सर्व नियोजन करण्याचे ठरविण्यात आले यावेळी कार्यक्रमाची रूपरेषा,पोस्टर लावणे, पार्किंग सोय आदीचे नियोजन कश्या पद्धतीने करता येईल या विषयी चर्चा करण्यात आली. मध्यवर्ती समितीचे सदस्य यावेळी हजर होते.