आगामी आठ दिवसात समितीच्या तमाम नेते मंडळीना एका व्यासपीठावर बोलावून एकी साठी प्रयत्न करणार सर्व नेत्यांनी आपलं जाहीर निवेदन लोकांसमोर मांडाव नाहीतर नेत्यांच्या घरा समोर पाईकांची गर्दी दिसेल असा इशारा वजा ठराव नेत्यांना देत पाईकांच्या बैठकीत सर्वानुमते संमत करण्यात आला.
रविवारी सायंकाळी मराठा मंदिरात समितीच्या पाईकांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत युवकांनी भरपूर गर्दी केली होती.बस्तवाड(हलगा) गावात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवण्यास विरोध करणाऱ्या त्या धर्मियांचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला आणि बस्त्वाडात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसली पाहिजे याला पाठिंबा सर्वानुमते व्यक्त करण्यात आला.
आगामी ३१ मार्च रोजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या दौऱ्यास पाठिंबा देत आठ दिवसात सक्रीय कार्य करू तर शिवाजी महाराजांच्या बाबतीत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नगरच्या उपमहापौर श्रीपाद छीन्दम यांचा निषेधाचा ठराव मांडण्यात आला.
सीमा लढ्यात जनता एकत्र आहे मात्र नेत्यात दुही मतभेद आहेत नेते जर स्वत हून एकत्र येत नसतील तर नेत्यांना एका व्हाव अन्यथा युवक पंच मंडळी व्यापक बैठक बोलावून नेत्यांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणू असे मत मदन बामणे यांनी व्यक्त केले. मराठी भाषिक वकील संघटनेचे पी एम टपालवाले यांनी एकीसाठी दबावगट तयार करणाऱ्या युवकांचे कौतुक करून पूर्ण वकील संघटनेचा या प्रक्रियेस पाठिंबा व्यक्त केला.
खानापूरचे वकील सरदेसाई यांनी केवळ असलेल्या समिती नेत्यात एकी न करता राष्ट्रीय पक्षात गेलेल्या मराठी भाषिकांची माने परिवर्तन करण्यासाठी देखील प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली आणि सीमा प्रश्न कोर्टात आहे से सांगून मराठी भाषिकांची मते परिवर्तीत करणाऱ्या राष्ट्रीय पक्षांना जशास तसे उत्तर देऊन प्रश्न कसा सुटेल आणि सीमा प्रश्नांसाठी समितीलाच का मतदान कराव यासाठी जनजागृती केली पाहिजे अस मत व्यक्त केले.आगामी निवडणुकीत महिला वकील आणि जाणकाराना कशी उमेदवारी देता यईल याचा विचार व्हाव अशी मागणी केली.
आचार संहिता लागू व्हायच्या आत नेत्यांनी एकत्र याव समिती पेक्षा नेते मोठे नाहीत त्यामुळे युवकांनी आणखी जोरात तर प्रत्येक नगरसेवकाने आपापला प्रभाग सांभाळावा अशी मागणी अनंत किल्लेकर यांनी केली.
३१ मार्च रोजी शर्व पवार यांच्या सभे अगोदर त्यांना एक पत्र लिहून सध्य स्थितीची माहिती देण्यात यावी आणि एकीसाठी पाईकांनी आणखी दबाव वाढवावा अशी मागणी भागोजी पाटील म्हणाले. नेत्यांना घाबरू नका त्यांना जाब विचारल्या शिवाय ते एकत्र येणार नाहीत निवडणुकात जिंकले तर नेते हरले तर कार्यकर्ते अस चित्र बदलायला हव एकीतून जो येईल तो उमेदवार त्यामुळे कोणीही उमेदवार लादू नये एकाच व्यासपीठावर आल्यावर केवळ नेत्यांनाच बोलायला देऊ असे मत श्रीकांत मांडेकर यांनी मांडले .
मराठा क्रांती मोर्चा जसा सीमा प्रश्ना शिवाय होणार नाही अशी भूमिका होती तशीच एकी शिवाय शरद पवारांचा कार्यक्रम नको अशी भूमिका घ्यायला हवी उत्तर मतदार संघात मराठी हिंदुत्व भूमिका करू असे मत सुधीर शिरोळे याने व्यक्त केले. यावेळी अनेक युवकांनी एकी बाबत परखड विचार व्यक्त केले.