मनोहर किणेकर दीपक दळवी यांच्या मी विरोधात नाही,कधीही एकीला तयार आहे मी युवकां सोबत आहे असे मत किरण ठाकूर यांनी मांडले.
आगामी विधान सभा निवडणुकीच्या पाश्व भूमीवर समितीत एकी व्हावी यासाठी झटत असलेल्या पाईकांनी शहर समितीचे अध्यक्ष किरण ठाकूर यांना एकी बद्दल निवेदन सादर केले त्यावेळी ते बोलत होते. शनिवारी रात्री लोकमान्य रंग मंदिरात पाईकां सोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ठाकूर यांनी जवळपास युवकांना अर्धा तास हून अधिक वेळ मार्गदर्शन केले.
आगामी काही दिवसात युवकांनी आपली शक्ती वाढवायला हवी ५० चे पाचशे आणि पाचशेचे पाच हजार बनले पाहिजेत तुमच्या मागे फोर्स निर्माण करा तरच यश मिळेल असे म्हणत युवक चांगले काम करत आहेत या कामी उद्योजक व्यापारी यांचीही बैठक बोलवू अस देखील ते म्हणाले.
आगामी निवडणुकीत एकास एक उमेदवार झाल्यासच समितीचा विजय निश्चित आहे यासाठी जनतेतून उमेदवार ध्या दोन्ही गटाची एकी होऊन उमेदवार येऊ देत तरच विजय होईल अस देखील त्यांनी पुढे स्पष्ट केल.
समितीत एकी आहेच सगळ्यांची मागणी महाराष्ट्रात जायची आहे त्यामुळं महाराष्ट्राने सोंग करू नये … पाईकांनो तुम्ही मोठे व्हा बॅक अप मिळत नाही म्हणून गप्प नको यातूनच नेतृत्व निर्माण होईल …काही लोक त्यांच्या स्वार्था साठी मला सोडून जात आहेत मी मालोजी दिपक दळवी सोडलेलं नाही त्यांनी मला सोडलंय.. असेही त्यांनी पुढें नमूद केलं.