आतापर्यंत नो हेल्मेट नो पेट्रोल शिवाय शहरात ठिकठिकाणी थांबुन दुचाकी स्वारा कडून जनजागृती करून अशी अभियाने राबवणाऱ्या बेळगाव पोलिसांनी हेल्मेटसक्ती साठी शॉर्ट फिल्म द्वारे प्रोमो करून जनजागृती करणार आहेत.
रहदारी नियंत्रण विभागाच्या पोलिसांनी शॉर्ट फिल्म द्वारे हेल्मेट सक्ती साठी जनजागृती करण्याचे ठरवलं असून जवळपास दीड मिनिटांच्या प्रोमोचे चित्रीकरण सदाशिवराव नगर भागात झाले आहेत.
हा दीड मिनिटांचा प्रोमो शहरातील सर्व चित्रपट गृहे,स्थानिक वृत्त वाहिन्या,न्यूज पोर्टल,आणि सोशल मीडियावर दाखवली जाणार आहे.गेल्या 22 फेब्रुवारी पासून सुरू झालेल्या नो हेल्मेट नो पेट्रोल मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळत असून नव्याने बनवण्यात आलेल्या शॉर्ट फिल्म द्वारे कार्पोरेट सेक्टर मधील लोकांना इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून हेल्मेट सक्तीची जनजागृतीची करणार असल्याची माहिती बेळगाव उत्तर विभाग रहदारी नियंत्रण विभागाचे पोलीस निरीक्षक आर आर पाटील यांनी दिली आहे.