जी एस टी आणि नोट बंदी मुळे देशातील देशातील गोर गरीब नागरिकांना फार मोठा त्रास सहन करावा लागला शिवाय हजारों कोटी रुपयांची फसवणूक करून विदेशाला पलायन केलेल्या उद्योग पतींवर केंद्र सरकार कडून कोणतीही कारवाई केली गेलीं नाही ही बाब निषेधार्ह आहे.निष्पाप शेतकऱ्यांचे कर्ज माफ न करता उद्योग पतींचे लक्षावधी कोटी रुपयांचे कर्ज केले असल्याचा गंभीर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.
ते अथणी येथील जन आशीर्वाद गोर गरीब शेतकऱ्यांच्या महिलांशी संवाद साधणाऱ्या कर्नाटकातील दुसऱ्या टप्प्याच्या प्रवास दौऱ्यात विराट जण सभेत बोलत होते.यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या,लोकसभेतील विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन, काँग्रेस प्रभारी के सी वेणूगोपाल,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जी परमेश्वर, ऊर्जा मंत्री डी के शिव कुमार आदी उपस्थित होते.
‘यल्लरिगे नमस्कार’सर्वाना नमस्कार असे कन्नड मध्ये म्हणत भाषणाला सुरुवात करून काँग्रेस मधील सर्व कार्यकर्त्यांवर आणि कर्नाटक राज्यावर माझा विश्वास असून आपण सर्व एक आहोत असे त्यांनी सांगून काँग्रेस पक्षाचे फार मोठे विचार आहेत.शेतकरी गोर गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना राज्यातील काँग्रेस सरकार मदत करीत असल्याचे ते म्हणाले.
भ्रष्टाचारा विरुद्ध आज मी लढा देत असून बोलल्या प्रमाणे वागत आहे गेल्या पाच वर्षात शेतकऱ्यांना मदत करीत त्यांचे कर्ज माफ केल्याची त्यांनी उपस्थित जन समुदायाला आठवण करून दिली.
मोदी विरुद्ध राहुल गांधींची ओरड
नरेंद्र मोदींची सरकारे सम्पूर्ण देशभर असली तरी काँग्रेसचे एकमेव सरकार असलेले कर्नाटक राज्य आहे लोकांची फसवणूक करू नका,खोटे बोलू नका त्यांना मदत करा असे बसवेश्वरांनी आपल्या वाचनात सांगितले असले तरी या देशात सर्व काही उलटेच सुरुआहे. देशाच्या बँकातून कोट्यवधी रुपयांची लूट केली गेली गुजरात मध्ये फसवणूक करून भाजप सरकार सत्तेवर आले शिवाय प्रत्येकाच्या नावावर 15 लाख रूपये ठेवतो असे आश्वासन देणाऱ्या मोदींनी देशाच्या जनतेची फसवणूक करू नका असा टोला त्यांनी लगावला.
राज्य सरकारने पाच वर्षात योगदान लक्षात घेता देशात भाजप मुक्त भारत करण्याची सुरुवात कर्नाटकातून झाली पाहिजे या करीत जनतेने काँग्रेसला साथ द्यावी असें आवाहन मुख्यमंत्री सिद्धरामय्या केलं यावेळी सभेस एक लाखाहून अधिक लोकांनी गर्दी केली होती.