अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे दुपारी 12:08 वाजता सांबरा विमान तळावर आगमन झालं होतं.राहुल यायच्या एक तास अगोदर मुख्यमंत्री सिद्धरामय्या,लोकसभेचे विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे विमान तळावर हजर होते राहुल यांचे विशेष विमानांनी आगमन होताच हेलीकॉप्टर नी अथनी ला रवाना झाले.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचं जिल्हा प्रशासनाच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आलं.आमदार फिरोज सेठ आणि अंजली निंबाळकर यांनी राहुल यांच्याशी चर्चा केली.पोलीस आयुक्त राजप्पा, जिल्हाधिकारी एस जिया उल्ला आदी अधिकारी यावेळी हजर होते.