टॉयलेट एक प्रेमकथा या अभिनेता अक्षय कुमार याच्या चित्रपटाने स्वच्छतेबद्दल बरीच जागृती झाली. आता बेळगाव च्या ग्रामीण भागात स्वच्छतेचे महत्व निर्माण करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ वेणूग्रामने बेनकनहळ्ळी या गावात शिवराज हायस्कुल विद्यालया साठी तब्बल साडे चार लाख रुपये खर्चून प्रसाधन गृह सुरू केले.
या उदघाटनाला उपस्थित मान्यवरांनी गौरव केला.
बेनकनहळ्ळी सारख्या गावात समाजासाठी रोटरीचे योगदान मोठे आहे. जसे आम्ही शेफ लोक पदार्थांची चव वाढवतो तसेच रोटरी समाजाची चव वाढवत आहे, गरजा ओळखून काम करण्याची पद्धत उल्लेखनीय आहे. असे मत सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी व्यक्त केले.
रोटरीचे माजी प्रांतपाल श्रीनिवास मालू यांनी बोलताना फक्त स्वच्छतागृहे आणि प्रसाधनगृहे बंधने हे रोटरीचे एकमेव उद्दिष्ट नसून स्वच्छता पाळणे ही जबाबदारीही आहे. आता नागरिकांनी या सोयीचा लाभ घेताना स्वच्छता पाळावी, असे आवाहन केले.
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील, रोटरीचे अनिल जैन,सुनील लड्डा, विक्रम पाटील आदी उपस्थित होते.