वंटमुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला जोडून तीस बेडचे प्रसूतिगृह उभारण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील महिलांची यामुळे चांगली सोय होऊ शकेल.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत या प्रसूतिगृहाची उभारणी होईल. याचा नियोजित खर्च २ कोटी ४७ लाख ७४ हजार ३९०.५१ इतका असून काम सुरू झाल्यापासून १२ महिन्यात ते पूर्ण करण्याची सूचना आहे.
ययासाठीची निविदा मागवण्यात आली आहे. २३ एप्रिल रोजी निविदेची छाननी होईल आणि मी ते जून याकाळात वर्क ऑर्डर काढली जाईल.