आगामी महापौर निवडणुकीची अधिसूचना मराठीतून ध्या अशी मागणी मराठी नगरसवेकांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे. आगामी निवडणुकात आम्ही महापौर आणि उपमहापौर निवडणुकासाठी सहभाग घेणार असल्याचे मराठी नगरसेवकांनी निवेदनात म्हटलं आहे.
बेळगाव शहरात मराठी भाषिकांची संख्या अधिक आहे त्यामुळे भाषिक अल्पसंख्यांक कायद्या नुसार मराठीतून निवडणूक अधिसूचना ध्यावी पालिकेत ३२ मराठी नगरसेवक आहेत बाबासाहेब आंबेडकरांचा घटने नुसार निवडणुकीची अधिसूचना मराठी तून ध्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.