पोलीस दलाच्या सूचनेनुसार उद्या सकाळी पासून बेळगाव शहरातल्या सर्व पेट्रोल पंपावर पेट्रोल हवे असल्यास हेल्मेट घालून जावे लागणार आहे.
पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांनी हा आदेश लावला आहे. आज सर्व पेट्रोल पंप चालकांची मीटिंग घेऊन आदेश देण्यात आला, सर्व पंपावर पोलीस राहील कुणीही वाद घातला तर कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे. पेट्रोल पाहिजे तर हेल्मेट घालूनच यावे असा आदेश आल्याने यापुढे हेल्मेट घालूनच फिरावे लागणार आहे.
Trending Now