एकीसाठी प्रयत्न करणाऱ्या पाईकांनी दोन्ही गटातील समिती नेत्यांना दिलेल्या पत्राबद्दल बराच वेळ मध्यवर्ती बैठकीत चर्चा झाली एकीच्या पत्रांचे पडसाद अपेक्षे प्रमाणे बैठकीत पाहायला मिळाले.एकी बद्दल भूमिका घ्या युवकांना दुखवू नका असा सूर देखील बऱ्याच नेत्यांनी बोलून दाखविला त्यामुळे युवा शक्तीचा विचार नेत्यांना करावा लागला आहे. सोशल मिडीयात काम करणाऱ्या आणि एकी साठी झटणाऱ्या युवकांना मिळालेलं यशच म्हणावे लागेल.
जेष्ठ नेते एन डी पाटील यांना गृहीत धरून नेमलेल्या साऱ्यांनी काम कराव आम्ही सर्व जन काम करत आहोत यात कुणीही येऊन कार्य करावे आणि कार्य करणाऱ्यांना एकत्रित सहकार्य कराव विशेष करून तरुणांनी सहकार्य कराव अशी भूमिका मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी एकी संदर्भात मांडली आहे.
मंगळवारी सायंकाळी झालेल्या मध्यवर्तीच्या बैठकीत एकीकरण समितीच्या पाईकांनी दिलेल्या निवेदनाच वाचन दळवी यांनी केल त्यावेळी मध्यवर्तीचे अध्यक्ष मालोजी अष्टेकर यांनी दळवी यांना किरण ठाकूर अध्यक्ष असलेली समिती तुम्हाला मान्य आहे का असा प्रश्न उपस्थित केला अन आहे तर आहे किंवा नाही म्हणून सांगा अशी मागणी करताच दळवी यांनी घटक समिती यावर निर्णय घेईल असे टोलवा टोलवीचे उत्तर दिले.
२५ वर्ष समितीतून बाहेर असलेले संभाजी पाटील आमदार झाले त्याच आमदार संभाजी पाटील यांनी आपण कोणत्या समितीचे आमदार आहे ? असा प्रश्न उपस्थित केला होता ती बातमी सगळीकडे आली होती एकजूट पाहिजेत सीमा लढ्यात जनतेची एकजूट हवी अशी नेते मंडळी कडून भाषण होतात आता युवकांनी एकीसाठी पुढाकार घेतलाय त्यात काय चुकीचे आहे असा देखील प्रश्न मालोजी अष्टेकर यांनी मांडला. मध्यवर्ती यावर काहीही करणार नाही मात्र घटक समित्या ज्यावेळी समितीचे उमेदवार निवडील त्यावेळी समस्या येणार आहे अस देखील त्यांनी स्पष्ट केल.
एकी बाबत बेळगाव तालुका सकारात्मक
तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी देखील एकी बाबत बैठकीत सकारात्मक भूमिका बैठकीत मांडली आहे.स्थानिक स्तरावर आमच्या गटातील कार्यकर्त्या सोबत काम करा आम्हीही स्वागत करू अशी भूमिका मध्यवर्ती कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी स्पष्ट केल आहे.
२००८ साली बाहेर असलेले आर आय पाटील २०१३ साली आत आले काम करत आहेत कृष्णा हुंदरे आमच्या गटात आले तस अनेक जन येऊ शकतात कुणीही येऊन काम करू शकतंय अशी भूमिका देखील त्यांनी मांडली आहे .
खानापूर समितीतील वाद मिटता मिटेना
खानापूर तालुका समितीत बिघडलेला वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेतलेली मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीला खानापूर समितीतील वाद मिटवण्यात काही प्रमाणात अपयश येत आहे.दिगंबर पाटील यांची झालेली अध्यक्ष निवडी करून एकोपा करण्यात बऱ्यापैकी मध्यवर्ती अपयशी ठरली आहे.
दोन्ही गटातील समित्यातील नावांची सूचित समान असलेल्या २७ जणांची वेगळी बैठक बोलवा त्यांची भुमिका काय ते कळवा अशी भूमिका मध्यवर्ती समितीने घेतली मात्र एक गट त्या निर्णया बद्दल नाराजी व्यक्त करत होता.