बेळगाव दक्षिण मतदार संघातून काँग्रेस मधून इच्छुक असलेले विधान परिषद सदस्य एम डी लक्ष्मीनारायण यांना अनगोळ तालुका पंचायतीत आणि जिल्हा पंचायतीत कार्यालयात मिळणार आहे.
या प्रकरणी राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिली होती त्या अनुसार एस जिया उल्ला यांनी जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आदेश त्वरित यांना कार्यालया करीत खाली असलेले कार्यालय उपलब्ध करून द्या असा आदेश बजावला आहे.
अनगोळ येथे तालुका पंचायतीच कार्यालय आहे ते कार्यालय एम डी यांनी जनतेची कामे करण्यासाठी संपर्क करण्यासाठी कार्यालय उपलब्ध करून ध्या अशी मागणी केली होती. विधान परिषद सदस्य लक्ष्मी नारायण यांनी बेळगाव जिल्हा नोडल जिल्हा म्हणून निवडला आहे दक्षिण मतदार संघात ते जनतेची कामे करत आहेत लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत त्यामुळं खाली असलेली तालुका पंचायतीचे इमारतीतील कार्यालय जिल्हा पंचायतीत देखील एक कक्ष त्यांनी मागितलं आहे.
आगामी विधान सभा निवडणुकी एम डी दक्षिण मतदार संघातून काँग्रेसचे संभाव्य प्रबळ उमेदवार म्हणून पुढे येत आहेत गेल्या दोन महिन्यात विणकर समाजाच्या पाठिंब्यावर त्यांनी बराच जण संपर्क वाढवला असून भाग्यनगर भागात स्थायिक झाले आहेत.