शिवसेना पक्षाची ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करणारा पक्ष म्हणून ओळख आहे. ही ओळख जपण्याचे काम प्रत्येक शिवसैनिक करत आला आहे. बेळगावातील शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर यांनी शिवसेनेची ही शिकवण आपल्या कृतीतून खरी करून दाखवली आहे.
केरवाडकर दक्षिण भारतात सहलीला गेले होते .त्यावेळी त्यांनी एका रशियन कुटुंबाला त्यांचे कागदपत्रे पासपोर्ट आणि पैश्याची बॅग सुरक्षितपणे देऊन प आपला प्रामाणिकपणा सिद्ध केला आहे.
गेल्या चार दिवसापूर्वी बंडू हे आपल्या परिवारासह तामिळनाडू वेल्लूर कृष्णानगरी येथील जिंजाकोट किल्ला फिरायला गेले होते .त्यावेळी किल्ल्यावर त्यांना एक बॅग सापडली होती. पोलीस स्थानक किंवा इतर कुणाला पोहोचवायला लावल्यास पैसे त्यांना परत मिळणार नाहीत म्हणून ती बॅग त्यांनी तब्बल सहा तास थांबून तिथे वाट पाहून स्वतः भेटूनच विदेशी पर्यटकांना वापस केली.
रशिया येथील मास्को शहरातील पास्को नावाचे कुटुंबीय भारतात सहलीला आले होते .जिंजाकोट किल्ल्यात त्यांची बॅग हरवली होती .त्या बॅगेत २ पासपोर्ट महत्वाची कागदपत्रे आणि १६ हजार रुपये रोख रक्कम होती ते सर्व सामान त्यांनी सुखरूप वापस केले. यावेळी पास्को यांनी डोळ्यातून अश्रू काढत बंडू यांना मिठी मारली आणि दहा हजारांचे बक्षीस घ्या म्हटल्यावर बंडू यांनी ते नाकारत आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत , कोणत्याही बक्षिसाची अपेक्षा ठेऊन आपण हे काम केले नाही.असे सांगत आपली पक्षाच्या तत्त्वावरील निष्ठा दाखवली आहे. संकटात असलेल्याना मदत करणे स्वतःचा जीव धोक्यात घालून देखील दुसऱ्यांचा जीव वाचवणे अशी शिकवण आम्हाला बाळासाहेबा कडून मिळाली असल्याचे बंडू यांनी बेळगाव live कडे बोलताना सांगितले.
संपर्क बंडू केरवाडकर
+918050420052