बेळगावच्या नम्रता नाद हिने मिस इंडिया एशियन स्पर्धेत यश मिळवले असून आता ती मार्च मध्ये थायलंड येथे होणाऱ्या मिस एशियन इंटरनॅशनल स्पर्धेत सहभागी होऊन भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
अवघ्या २१ वर्षेची नम्रता ही आपली स्वप्ने पाहून पूर्ण करण्यात पुढे आहे. मिस इलाइट, रिलायन्स जेवेल्स मिस इंडिया हे ‘किताब तिने मिळवले आहेत.
सामाजिक कामे आणि निराधार मुलांसाठी काम करण्याचे बाबत जागृती हे तिचे प्रमुख उद्दिष्ट आहे.