बेळगाव तालुक्यातील पूर्व भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून दोन गटात वाद शिगेला पोचला आहे.कायदा आणि सुव्यवस्था बिगडू नये यासाठी उद्या १९ फेब्रुवारीला तिथी निमित्य शिवजयंतीला होणारी शिवाजी महाराजांची प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम रद्द केला आहे.
छत्रपती शिवराय शिवसृष्टी युवक मंडळाच्या वतीने गावातील मराठी शाळेसमोर सर्व्हे नंबर १६६ मध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. यासाठी या चौकात चौथरा देखील उभा करण्यात आला आहे पुतळा बसवण्यासाठी ग्राम पंचायतीच्या ठरावा पासून अनेक परवानग्या या मंडळाने मिळवल्या आहेत, असे असताना दुसऱ्या एका समाजाने या सर्व्हे नंबर १६६ मधल्या जागेत नियोजित पुतळा बसू नये अशी मागणी करत जिल्हाधिकाऱ्याना निवेदन देत आत्मदहनाचा इशारा दिला होता यामुळे सध्या बस्तवाडात तणावाचे वातावरण असून पोलीस प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यासाठी उद्या होणारा कार्यक्रम रद्द केला आहे.
छत्रपती युवक मंडळास बेळगाव तालुक्यातील एका राजकीय गटाने पुतळा स्पॉन्सर करत पाठिंबा दिला असून नेमका त्याच्या विरोधी गटाने या जागेत पुतळा बसवण्यास विरोध केला आहे.
आता पुतळा बसवण्यासाठी प्रयत्न करणार गट सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपला संताप मांडणार आहे. कार्यक्रमास परवानगी द्यावी नाहीतर आंदोलन पुकारू असा इशारा देण्यात आला आहे.