स्मिता पाटील बनल्या होममिनिस्टर स्पर्धेच्या विजेत्या
नियती फाऊंडेशन आयोजित होम मिनिस्टर स्पर्धा उत्साही वातावरणात बी के मॉडेल हायस्कुलच्या मैदानावर विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पाडली.स्मिता पाटील या होम मिनिस्टरचे विजेतेपद पटकाविले.संज्योती धामणेकर द्वितीय आणि बिना तलाठी या तृतीय पुरस्काराच्या विजेत्या ठरल्या.
पद्मश्री सितव्वा जोडट्टी आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी प्रमुख पाहुण्या म्हणून उपास्थित होत्या.विविध फेऱ्यामुळे स्पर्धा अधिकच रंगतदार होत गेली.महापौर संज्योत बांदेकर,डीसीपी सीमा लाटकर,डॉ.नीता देशपांडे,मयूरा शिवलकर आणि अंकिता गोजे,कॅटोंमेंट सी इ ओ दिव्या शिवराम यांचा त्यांनी बजावलेल्या कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी वधूच्या मेकअप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.सत्तरी गाठलेल्या महिलांनीही या स्पर्धेत भाग घेऊन आपल्या उत्साहाचे दर्शन घडवले.विजेत्यांना अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि डॉ.सोनाली सरनोबत,डॉ.नीता देशपांडे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
मराठी चित्रसृष्टीत नवेदीत दिग्दर्शकांची संख्या वाढले ही मराठी साठी जमेची बाजू आहे.मराठी चित्रपट केवळ ऑस्कर साठी न येता इतर चांगले विषय घेऊन घेऊन बनले पाहिजेत असे मत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केली
सेन्सरशीप वर सदस्यांची नियुक्ती आम्हीच केलेली असते आजकल चित्रपटांची नाव बदलणे,सीन कट करणे याला काही प्रमाणात निर्मातेच जबाबदार आहेत असेही त्या यावेळी म्हणाल्या.