Sunday, November 24, 2024

/

मालमत्ता विकणाऱ्या अप्पूगोळ च्या साथीदारास अटक

 belgaum
संगोळी रायाणा सोसायटीच्या माध्यमातून ठेवीदारांची  फसवणूक झाली असतांना आणि  याबद्दल प्रकरण न्यायालयात गेलेले असतांना पोलीस आणि न्यायालयाची नजर चुकवून मालमत्ता विकणाऱ्या आनंद अप्पूगोळ याच्या साथीदारास बेळगाव पोलिसांनी अटक केली आहे.
संजय पाटील असे त्याचे नाव असून या प्रकरणात बेळगावचे सब रजिस्ट्रार सुरेश हंदीगुड आणि डॉ राव या दोघांचीही चौकशी होणार आहे. अप्पूगोळ यांच्या मालकीच्या पाच मालमत्ता विकण्याच्या प्रयत्नात तो होता.
फसवणूक झाल्याने अडकून पडलेली ठेव रक्कम २५० कोटी इतकी आहे.  आणि मालमत्ता ८० ते १०० कोटीच्या घरात आहेत, यामुळे लोकांचे पैसे कसे देणार याची चोकशी सुरू असतानाच साथीदार वापरून परस्पर विक्री व्यवहार करण्याचा डाव हणून पाडण्यात आला आहे.
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.