जस जशी निवडणूक जवळ येऊ लागली आहे तस तशी समितीत एकीच्या हालचालींना वेग येऊ लागला आहे आजवर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती किरण ठाकूर गट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गटाकडून समितीची एकी करण्यासाठी धडपडत असणाऱ्या पाईकांना पहिला पाठींबा देण्यात आला आहे.
शनिवार दि १७ रोजी बैठक घेऊन हा पाठींबा देण्यात आला आहे. अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष वाय बी चौगुले होते. युवा कार्यकर्त्यांनी एकीबाबत जे निवेदन दिले होते त्या प्रयत्नांना सकारात्मकरित्या प्रतिसाद देण्याचे ठरवण्यात आले. एकी साठी चाललेले हे काम चांगले असून त्याला पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीला वाय बी चौगुले, मनोज पावशे, सुरेश अगसगेकर, भावकाणा पाटील, म्हात्रू झंगरुचे, आप्पा जाधव, अशोक य पाटील, परशराम पाटील, सुनील अष्टेकर, शिवाजी शिंदे, पुंडलिक पावशे, पुंडलिक मोरे, केदारी विठ्ल गुरव,पिराजी मुचंडिकर व नारायण कणबरकर हे उपस्थित होते.