तालुका पंचायतिची बैठक शुक्रवारी तहकूब झाली आहे. सर्व सदस्यांना समांतर फंड न वाटल्याने शुक्रवारी तालुका पंचायतीची बैठक रद्द झाली आहे, अध्यक्ष शंकरगौडा पाटील यांनी मनमानी कारभार करत मंजूर झालेला निधी समांतर वाटण्यास विरोध दाखविला आहे.
त्यामुळे काँग्रेस सदस्यांनी सभागृहाबाहेर पडून सभात्याग केला, त्यानंतर सभागृह चालवण्यासाठी संख्याबळ कमी पडले त्यामुळे अध्यक्षांनी ३० मिनिटांचा वेळ दिला होता.
अर्ध्यातासानंतर पुन्हा सभागृह सुरू करण्यात आले मात्र सदस्यानी गैरहजेरी दाखवली, यामुळे काहीच कामकाज होऊ शकले नाही. यातच मराठी कागदपत्रे व फलकांसाठी मराठी सदस्यांनी आवाज उठवला. आम्ही भाषिक अल्पसंख्याक आहे, आम्हाला आमचे हक्क मिळालेच पाहिजेत अशी मागणी लावून धरण्यात आली होती.