पद्मावत चित्रपट सुरू असताना प्रकाश चित्रपटगृहावर रॉकेलने भरलेली बाटली फेकुन आग लावण्याचा प्रयत्न केलेल्या तरुणास पोलिसांनी अटक केली आहे.
संभाजी मारुती पाटील वय २८ रा.हलकर्णी( तालुका खानापूर) असे त्याचे नाव आहे. पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले होते. सीसीटीव्ही फुटेज पाहून तपास करता संभाजी हाती लागला.
बेळगावात करणी सेना नाही, मग हा प्रकार कुणी केला या दिशेने तपास सुरू असताना संभाजी हा श्रीराम सेनेचा कार्यकर्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
रॉकेल बॉम्ब टाकून दहशत माजवल्याचा गुन्हा त्याच्यावर खडेबाजार पोलीस स्थानकात दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास सुरू आहे.
Trending Now