एन एस यु आय च्या वतीने शहरातील चन्नम्मा चौकात भजी वितरण करून केंद्र सरकारच्या विरोधात अनोखे आंदोलन केल. एन एस यु आय च्या कार्यकर्त्यांनी स्वत कित्तूर चन्नम्मा चौकात भजी तयार केली आणि वितरीत करून केंद्राचा निषेध केला.
पंत प्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेस विरोधी केलेल्या वक्तव्याचा विरोध करत ही निदर्शन करण्यात आली मोदी यांना पकोडा मन, तर उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पाणीपुरी मन तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना बोंडा मन संबोधलेल व्यंग चित्र हातात घेऊन निदर्शन करण्यात आले एन एस यु आय तालुका अध्यक्ष संगनगौडा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही निदर्शन करण्यात आली.