एक महिन्यापूर्वी ते बेळगावला आलेले, त्यांनी शब्द दिला , बेळगावच्या लाल मातीच्या प्रेमा खातर दिलेला शब्द त्यांनी पाळून दाखवला ते व्यक्तिमत्व दुसर कुणी नसून परराष्ट्र खात्याचे सचिव ज्ञानेश्वर मुळ्ये होय..
गेल्या १४ जानेवारी रोजी कडोली येथील मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्या निमित्ताने ते बेळगावला आले होते त्यांनी संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात आणि सिटिझन कौन्सिल शी बोलताना आगामी एका महिन्यात बेळगावातील नवीन पासपोर्ट केंद्र सुरु करू असं आश्वासन दिले होते ,बरोबर एका महिन्यात म्हणजे बुधवारी बेळगावचे पासपोर्ट केंद्र सुरु करून त्यांनी दिलेला शब्द पाळला तर आहेच याशिवाय आपलं बेळगाव शहरावर किती प्रेम आहे हे सुद्धा सिद्ध करून दाखवलं आहे.
गेली अनेक वर्षे नवीन पासपोर्ट केंद्र सुरु होण्याच्या प्रतीक्षेत होते शेवटी १४ फेब्रुवारी व्हलेनटाइन्स दिनाच्या निमित्ताने नवीन पासपोर्ट केंद्र सुरु झालं आहे. मुळ्ये यांना लोक म्हणत होती की तुम्ही तुमच्या गावात कोल्हापुरात सुरु केला बेळगावात का नाही?अस लोक विचारत होते जेवढ मी कोल्हापूर वर प्रेम करतो तेवढंच बेळगाव वर करतो या बेळगाव शहराने मला खूप प्रेम दिलय माझ पाहिलं पुस्तक ‘माती,पंख आणि आकाश’हे महाराष्ट्रात नाही तर बेळगावात प्रकाशित झालं आहे.कर्नाटक शासनाच्या मराठीच्या दहावीच्या पाठ्य पुस्तकात माझ्या ‘माती,पंख आणि आकाश’ पुस्तकातील धडा समाविष्ट करण्यात आला आहे ही अभिमानाची गोष्ट आहे असही ते म्हणाले .
बेळगावच पासपोर्ट कार्यालय सुरु करण्यात सिंहाचा वाटा आहे हे सर्वश्रुत असताना मुळ्ये यांनी आपल्या भाषणात हे सर्व श्रेय उत्तर कर्नाटक पोस्ट खात्याच्या विभागीय अधिकारी वीणा आर श्रीनिवास,प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी भारतकुमार कुथाटी आदि अधिकाऱ्यांना देत होते यातूनच त्यांचा मोठेपणा दिसून येत होता.