आगामी ३१ मार्च पर्यंत देशात २५० नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करणार असून बेळगावातील नव सुरु झालेल हे या वर्षातल ६३ वे केंद्र आहे कर्नाटकातील एकूण ३० पैकी १७ जिल्ह्यात ही सेवा सुरु करणार आहे अशी माहिती पर राष्ट्र खात्याचे सचिव ज्ञानेश्वर मूळ्ये यांनी दिली.
बुधवारी सकाळी बेळगाव पोस्ट कार्यालयात नवीन पासपोर्ट सेवा उद्घाटन केल्यावर ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार प्रकाश हुक्केरी,सुरेश अंगडी,प्रभाकर कोरे,जिल्हाधिकारी एस जिया उल्ला,महापौर संज्योत बांदेकर,पोलीस आयुक्त डी सी राजप्पा, पालिका आयुक्त कुरेर, कॅटोंमेंट सी इ ओ दिव्या शिवराम ,उत्तर कर्नाटक पोस्ट खात्याच्या विभागीय अधिकारी वीणा आर श्रीनिवास,प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी भारतकुमार कुथाटी आणि आयकर आयुक्त शर्मा उपस्थित होते.
पोस्ट खात्याने कार्यालय जागा दिल्यानेच हे शक्य झाले असून आज पासून ५० जण नवीन पासपोर्ट साठी मुलखाती देऊ शकतात.बेळगावा नंतर सातारा सांगली रत्नागिरीत देखील नवीन पासपोर्ट सुरु होईल प्रत्येक जिल्हा केंद्रात नवीन पासपोर्ट कार्यालय सुरु करण्याचे भारत सरकार आणि परराष्ट्र खात्याच हे स्वप्न आहे अस देखील ते म्हणाले.
देशाची लोकसंख्या १२५ कोटी आहे देशात ८ कोटी लोकांकडे पासपोर्ट आहे हे लज्जास्पद गोष्ट आहे आता वेळ काळ बदलला असून पासपोर्ट केवळ श्रीमंत नाही सगळे जण काढत आहेत. विदेशात देखील भारतीयांना मान सन्मान मिळावा म्हणून जिल्हा स्तरावर पासपोर्ट केंद्र करत आहोत. पासपोर्ट प्रतिभेचे पंख आहे कुठेही फिरायला परवानगी देते. विदेशात कुही संकटात कुणीही संकटात असेल तर परराष्ट्र खाते मदत करत आलंय असेही त्यांनी नमूद केल. महापौर संज्योत बांदेकर सह सारणी देखील आपले विचार यावेळी व्यक्त केले.
Nice