बेळगावातील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल केंद्राच्या वतीने मराठा सेंटर एका वर्तमान पत्रात आलेल्या बातमीचे स्पष्टीकरण दिले आहे.
दिनांक 05 फेब्रुवारी 18 रोजी बेळगावातील एका ‘वर्तमान पत्रिका मधील बातमीत स्पष्ट केले आहे की, ‘फायरिंग रेंजसाठी जमीन अधिग्रहित करण्याच्या प्रस्तावामध्ये’ असे लिहिले आहे, जे पूर्णपणे चुकीचे आहे. सामान्य जनता आणि लष्करी अधिकाऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा दुर्दैवी प्रयत्नकेला जात आहे.
नानावाड़ी व मंडोली असे नऊ गावांच्या आसपास7,496 एकर जमीन कायमस्वरुपी प्राप्त करण्यासाठी सैन्य अधिकारी प्रस्ताव देत असल्याचे उद्धृत केलेल्या लेखनातून स्पष्ट केला आहे. तथापि, हे लक्षात घ्यावे की 7,496 एकर जागेचा उल्लेख केला जात आहे, त्या मधील 609 एकर जमीन ही बगदाद असमारा फायरिंग रेंज A1 संरक्षण जमीन आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापूर्वी पासून ही ज़मीन केवळ लष्करी प्रशिक्षणासाठी वापरले जात आहे,तसेच या जमिनीचा वापर शेतीविषयक उपक्रमांसाठी केला जात आहे जसे लेखात सांगितले आहे.
लष्कराच्या गोळीबारामुळे आयुष्य आणि मालमत्तेच्या दुखापतीबद्दलची माहिती चुकीची आहे कारण लष्कराचे फायरिंग पद्धतींचा अवलंब करण्यासाठी सुरक्षा नियम कठोर आहेत. नागरीअधिकारी आणि पोलिस विभाग यांना गोळीबाराचे संचालन करण्याच्या योग्य मंजुरीसाठी कळविले जाते. आजपर्यंत जीवघेणी हानी किंवा गोळीबारामुळे झालेल्या दुखापतीचा एकही प्रकार समोर आलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे.लष्कराच्या सर्व सुरक्षेसंदर्भात सावधानतेचा इशारा दिला जातो.
हे सर्व समजून घेणे आवश्यक आहे कि गोळीबाराच्या प्रशिक्षणाने त्यांना सशस्त्र राष्ट्रीय हिताच्या संरक्षणासाठी सक्षम बनविले जाते. लष्कर नेहमीच बाह्य धमक्या आणि आंतरीक गोष्टींविरोधात कठोरपणे उभे राहिलेले आहे. नैसर्गिक आपत्तींमधे भारतातील नागरिकांना लष्कराच्या सक्षम प्रशिक्षण आणि शिस्ति मुळेच संरक्षण मिळाले आहे. म्हणूनच पुन्हा असे सांगावेसे वाटते की, निवडक व्यक्तींच्या स्वार्थासाठी बेळगावमधील लष्करी अधिका-यांच्या विरूध चुकीची माहिती दिली जात आहे.