समिती नेत्यांनी निवडणुकीच्या अगोदर एकत्र यावे यासाठी दोन दिवसात सर्व नेत्यांना एकीचे निवेदन देण्याचा ठराव युवकांच्या बैठकीत घेण्यात आला.
मंगळवारी रात्री शहापूर येथील गंगापूर मठामध्ये समिती कार्यकर्ते आणि कोरे गल्ली पंच मंडळी यांची संयुक्त बैठक पार पडली यावेळी बोलताना कार्यकर्त्यानी एकीवर भर दिला तसेच मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने ठोस भूमिका घ्यावी व व्यापक बैठक घेण्याची मागणी करण्यात आली असे मत व्यक्त झाले.
आगामी चार दिवसात मोठी व्यापक बैठक घेऊन घेणार एकीचे जागृती युवा मेळावे घेण्याचा निर्धार देखील पाईक युवकांनी केला.20हजार युवकांचा एकीचा मेळावा येळ्ळूर मधून व्हावा अशी देखील मागणी या बैठकीत झाली.कोरे गल्ली येथील पंच शिवाजी हावळाणाचे यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक झाली.समितीचे पाईक मोठया संख्यने या बैठकीस हजर होते.