KA 22 अशी नोंदणी नसेल तर कार पार्किंग करण्याचे शुल्क ३० रुपये असेल असा अजब नियम कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पार्किंग वाल्याने सुरू केला आहे.
धर्मवीर संभाजी चौकात कार पार्क करणाऱ्या नागरिकास असा अनुभव आला आहे.
येथे कार पार्किंग चा दर दोन तासाला १० आणि चार तासाला २० रुपये असा आहे. पण तीस रुपये मागितल्याने मोठा वाद झाला, पण त्या नागरिकाने २० रुपयेच दिले, जर तो भांडला नसता तर जादा १० रुपये घेण्यात आले असते.
आता हा KA 22 चा नवीन नियम कुणी लावला याचा शोध घ्यावा लागेल. पार्किंग कंत्राटदार पैसे उकळण्यासाठी नवं नवीन मार्ग काढत आहे. मात्र बोर्ड काहीच कारवाई करत नाही हे आश्चर्याचे आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य यावर आवाज उठवणार की त्यांचीही मिलीभगत आहे? याचाही शोध घ्यावा लागेल.