महसूल खाते, खरेदी विक्री व्यवहार आणि कागदपत्रे यांचा मेळ घालणारे भूमी हे सरकारी सॉफ्टवेयर बंद पडल्याने अनेकांचे हाल सुरू झाले आहेत. उतारेच मिळत नाहीत तसेच ऑनलाईन व्यवहारच होत नसून कामे खोळंबली आहेत.
भूमी हे सॉफ्टवेयर सर्व्हर डाऊन असल्याचे सांगून बंद ठेवण्यात आले आहे, गेल्या काही महिन्यांपासून हे असेच चालू आहे, याकडे लक्ष दिले जावे आणि अडलेली कामे सुरू करावीत अशी मागणी होत आहे. कधीही तहसीलदार कार्यालयाकडे सात बारा साठी गेले असता लांब च्या लांब रांका आणि सर्व्हर डाऊन असलेले चित्र पहावयास मिळते.
शहरातील तलाठी शिंदे के काम चुकारू पणा करत असून नेहम सर्व्हर डाऊन आहे असे सांगून याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहेवरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून लवकरात लवकर उतारे मिळावी अशी सोय करावी अशी मागणी देखील केली जात आहे.