महा शिव रात्री निमित्य शिव मंदिरा समोर मोफत पूजेचे साहित्य वितरण केलं जातं आहे.
भाजप नेते डॉ रवी पाटील यांच्या माध्यमातून विभूती, गंगाजल आणि रुद्राक्ष सह इतर साहित्याचे वितरण सुरू आहे.दक्षिणेतील काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिर सह अन्य मंदिरा समोर दर्शन घ्यायला येणाऱ्या भक्तांना हे वितरित केलं जातं आहे.
दीपावलीत पणत्या,दसऱ्यात ऊस, गणपतीत फळ वाटण्याची परंपरा शिव रात्रीत पूजेचे साहित्य वितरित करून चालुच ठेवली आहे. जवळपास 50 हजार हुन अधिक पाकिटं बनवून त्यांनी वितरीत केली आहेत.