विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले तसे कार्यकर्ते मेळावे घेऊन एकीची भाषा करू लागलेत हे समितीसाठी चांगले संकेत आहेत मात्र एकीची भाषा ही निवडणुकीच्या तोंडावरची असून उपयोगाची नाही.एके काळी बेळगाव मधे दोन दोन समित्या कार्यरत होत्या मात्र त्यांचा उद्देश एकच होता.आता परिस्थिती वेगळी आहे.त्याकाळी बेळगाव मध्ये 80% मराठी माणसे कार्यरत होती शिवाय जैन सह मुस्लिम आदी अनेक जाती पातीची लोक समीतीशी सलग्न होती.मग काळ बदलला आणि बेळगाव मधे राष्ट्रीय पक्षांचा शिरकाव सुरू झाला.काही राष्ट्रीय पक्ष तर हिंदुत्वाची शाल पांघरूण मराठी माणसाचा बुद्दीभेद करू लागली की जणू काही हिंदुत्वाचा वसा यांच्याकडेच आहे आणि त्याला काही तथाकथित मराठी नेते त्या पक्षाकडे ओढले जाऊ लागले.पण त्यांना हे माहीत नाही की त्यांचा वापर फक्त टिशु पेपर सारखाच हे राष्ट्रीय पक्ष करणार आहेत. असं पत्रक बापट गल्लीतील क्लीकादेवी मंडळाने काढलं आहे .
हिंदुत्वाच्या नादात मराठी माणूस हि ह्या पक्षाकडे ओढला जात असून याला कारण म्हणजे या पक्षांकडे निवडणुकीसाठी लागणारा अमाप पैसा.तेव्हा आमच्या नेत्यांनो तुमचा ईगो सोडा शांतपणे ह्या कार्यकर्त्याच्या भावनांचा विचार करा.सीमाप्रश्न अंतिम टप्यात असताना जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न करूया.तिकीट कुणालाही मिळो सीमाप्रश्ना साठी ही तडजोड करावीच लागणार.निवडणुक आल्यावर मरणाला आणि लग्नाला जाणाऱ्या धूर्त नेत्यांनो ओळखा.तिकीट एकट्यालाच मिळणार त्याच्या पाठीमागे खम्बीरपणे उभे राहण्याचा निश्चय करा असा सल्ला देखील या मंडळाने पत्रकातून दिला आहे .
तुम्ही मराठी कार्यकर्ते एकी करा नाहीतर नोटा पर्याय उपलब्ध आहे असे सांगत आहेत त्याला आमचा तर विरोधच राहणार.नोटा हा समिति साठी पर्याय होऊच शकत नाही.प्रत्येक मंडळाने या कामी दोन्ही समिति मधील नेत्यांवर दबाव आणावा.जर त्या नेत्यांनी बंडखोरी केली तर त्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याची हि तयारी ठेवली पाहिजे.प्रसंगी त्या नेत्यांना गल्लीत प्रवेशबंदी करा.एकी करा तरच गल्लीत प्रवेश ह्या गोष्टींवर पंच युवक मंडळ व नागरिकांनी ठाम रहावे असा इशारा देखील देण्यात आला आहे
.या निमित्ताने मराठी कार्यकर्त्यांना आवाहन करू इच्छितो की राष्ट्रीय पक्ष पैसे आणि इतर बरेच पदार्थ देतील हि पण हे फक्त 15-20 दिवसा पर्यंतच पूरनार.बाकी पाच वर्ष आपली अस्मिता गहाण ठेवण्यापेक्षा समितीनिष्ठ माणूस म्हणून जगा……भारतातील निवडणुक ही जातिवाद आधारितच लढवली जाते.मग मराठी माणसाने मराठी अस्मितेसाठी समितीलाच मतदान केले तर आपला स्वाभिमान आपली निष्ठा सीमाप्रश्न बद्दल जागरूक आहे हे युवा पिढीला जाणवेल ह्यात शंका नाही..आणि एकी ह्या साठीच की राष्ट्रीय पक्ष कधीही कायद्याच्या चौकटीची भाषा करत नाहीत.कायद्याने सर्व परीपत्रके त्या त्या भाषेतील लोकांना देण्याची परवानगी दिली आहे पण एक हि राष्ट्रीय पक्षाने मराठी माणसाच्या मागणीचा पाठपुरावा केला नाही म्हणून आपल्या नेत्यांनो एकी करा आणि बेळगाव मधून राष्ट्रीय पक्षांना हद्दपार कराअस देखील या मंडळाने समिती नेत्यांना उद्देशून म्हटलं आहे..एकीचे बळ देईल फळ