विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच मतदारसंघातील इच्छुक मतदारांची धावपळ सुरू आहे. वेगवेगळ्या मार्गाने आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. या प्रयत्नात बेळगाव उत्तर मतदार संघात महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार कोण याबद्दल चर्चा आहे. मराठी मतांच्या जोरावर आणि मुस्लिम मतांच्या मदतीने आपण कसे निवडून येऊ शकतो हे सिद्ध करण्याचा प्रयत्न काही इच्छुकांनी सुरू केला आहे.
मागील निवडणुकीत म ए समितीच्या उमेदवार रेणू किल्लेकर या होत्या. त्यांनी २८ हजार मते मिळवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला. त्यानंतर महिला आघाडी आणि इतर उपक्रमाच्या निमित्ताने त्या दररोज महिला आघाडी हॉटेल च्या निमित्ताने शेकडो लोकांच्या संपर्कात सक्रिय असतात यासह गेली पाच वर्षे महिला आघाडीच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवत आलेत यामुळे उमेदवार निवडीच्या निमित्ताने त्यांना प्राधान्य दिले जाणार का, हे शहर म ए समितीने अध्याप ठरवलेले नाही, पराभूत उमेदवार म्हणून दुसरा उमेदवार पुढे आणला जातो की त्यांनी मिळवलेल्या मतांच्या जोरावर त्यांना पुन्हा संधी दिली जाते हे स्पष्ट नाही.
चव्हाट गल्ली येथील ज्येष्ठ वकील किसनराव येळ्ळूरकर यांचे पुत्र आणि पायोनीयर बँकेचे संचालक अमर येळ्ळूरकर यांनी मागील वेळी उमेदवारी मागितली होती, पण त्यांना डावलण्यात आले होते, यावेळी त्यांनी पुन्हा आपला दावा केल्यास समितीला विचार करावा लागणार आहे.
या दोघांच्या बरोबरच अनेक हौसे आणि गवसे कामाला लागले आहेत.आता चर्चा एकच आहे न भांडता एक उमेदवार देऊन विजय होणे महत्त्वाचे आहे.
उत्तर भाजपात उमेदवार संख्या अधिक असल्याने इच्छुकांत भांडण आहेत त्यामुळे भाजपात कुरघोडीचं राजकारण होणार हे नक्की आहे मुस्लिम समाजात विध्यमान आमदारां विरोधात नाराजी आहे त्यामुळं याचा फायदा समिती उमेदवाराला होऊ शकतो.आणखी वेगळ्या नावांची देखील चाचपणी सुरू आहे त्यामुळे कुणाच्या गळयात उमेदवारीची माळ पडते हे पहावं लागेल.