आमच्या पैकी कुणालाही उमेदवारी ध्या आम्ही तन मन आणि धन लावून पक्षासाठी काम करायला तयार आहे आम्ही सर्वजन इच्छुक आहोत ‘त्या’ माजी आमदारास उमेदवारी देऊ नये अशी मागणी भाजपच्याच पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
शनिवारी केंद्रीय रेल्वे मंत्री आणि भाजप प्रभारी बेळगाव दौऱ्यावर आले असता गोयल यांना लेखी स्वरुपात निवेदन दिले आहे.
डॉ एस एम दोडमनी,पांडुरंग धोत्रे,सुनील चौगुले,दीपक जमखंडी,चिदंबर देशपांडे,उमेश शर्मा,तेजस्विनी धाकलूचे,जितेंद्र कदम,निलकंठ मास्तमर्डी आदींनी समाजात त्या माजी लोकप्रतिनिधीची छबी खराब झाली आहे त्यामुळे पक्षाच नाव देखील खराब होत आहे अश्याना उमेदवारी देऊ नये अश्या आशयाच गोयल यांना निवेदन दिले आहे.
सध्या सर्व्हेच काम सुरु असून सर्व्हेच्या अहवाल याशिवाय संघाचे विस्तारक नेमलेले आहेत त्यांचा देखील अहवाल घेऊन तिकीटा बद्दल निर्णय घेतला जाणार आहे अस आश्वासन गोयल यांनी यावेळी दिल. यावेळी खासदार सुरेश अंगडी देखील उपस्थित होते.