विधान सभा निवडणूक अजून तीन महिने लांब आहे अश्यात जे कुणी उमेदवार तिकीट मलाच मिळणार अस सांगत असतील तर अश्यांना अगोदर तिकीट दिल जाणार नाही त्यांचाच पत्ता कट केला जाईल असे स्पष्ट इशारा कर्नाटक भाजप प्रभारी पियुष गोयल यांनी दिला आहे.
एका दिवसाच्या बेळगाव दौऱ्यावर आले असता त्यांनी बेळगाव जिल्ह्यातील प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांची हॉटेल संकम सभागृहात आढावा बैठक घेतली. बैठकीत माजी मंत्री भालचंद्र जारकीहोळी,उमेश कत्ती, खासदार सुरेश अंगडी,प्रभाकर कोरे,आमदार संजय पाटील,विश्वनाथ पाटील,विश्वनाथ मामनी,महांतेश कवटगीमठ, इराणणा कडाडी, राजेंद्र हरकुनी आदी उपस्थित होते.
बेळगाव जिल्ह्यात मागील निवडणुकात भाजपला जो फटका बसला आहे तो भरून काढायचा असेल तर कार्यकर्ते आणि नेत्यांनी एकत्रित पणे राबायला हवं या शिवाय २००८ आणि २०१३ मध्ये भाजपच्या जागा का कमी झाल्या कुठल्या मतदार संघात का याचा विचार विनिमय करून पूर्ण ताकतीने काम करा असा सल्ला जिल्ह्यातील बहुतेक नेत्यांनी गोयल यांना बोलून दाखवला.
आगामी निवडणुकीत घाई गडबडीने तिकीट वाटप नको सर्वांचे विचार ऐकूनच तिकीट वाटप करा अशी मागणी माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष इराणणा कडाडी यांनी केला.
अमित शाह यांच्या टीम कडून पाहणी
केंद्रीय रेल्वे मंत्री आणि कर्नाटक भाजप प्रभारी पियुष गोयल यांच्या बेळगाव दौऱ्याच्या पाश्वभूमीवर सगळ लक्ष गोयल यांच्याकडे केंद्रित असताना त्यांच्या ताफ्यात दिल्लीहून भाजप अध्यक्ष अमित शाह यांची टीम देखील बेळगावात दाखल झाली आहे.
गोयल यांच्या पत्नी सीमा गोयल यांच्या सोबत ती टीम अनेक ठिकाणी बैठका कार्यक्रमा वर लक्ष ठेऊन होती. चेंबर ऑफ कॉमर्स चा कार्यक्रम असोत किंवा रेल्वे स्थानकाचा कार्यक्रम असो संकम हॉटेल येथील पक्षाची बैठक असो शाह यांच्या टीम सगळी माहिती एकत्रित केली आहे राज्यातील विस्तारका सोबत चर्चा केली आहे.
पुढील विधान सभा निवडणुकीत बेळगाव भाजपची उमेदवारी कुणाला दिल्यास काय गणित होईल कोणत्या उमेदवारास विरोध होईल? यावेळेस स्वच्छ प्रतिमेचे चेहरे दिल्यास काय गणित होतील याचा अभ्यास शाह टीम कडून केला जात आहे.