गेल्या सहा महिन्यात रेल्वे खाली सापडून झालेल्या आत्महत्या रोखण्यासाठी शहरातील रेल्वे मार्गावर दोन्ही बाजूनी संरक्षण भिंत उभारण्याचे काम पंधरा दिवसात सुरू करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे.
या याशिवाय बेळगावातील रेल्वे स्थांनकावर पत्रकारासाठी वेगळी तिकीट खिडकी सुरू करण्याचे आदेश दक्षिण पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांना दिले आहेत.
सिटीझन कौन्सिल तर्फे रेल्वे मंत्र्यांपुढे मांडल्या मागण्या
बेळगावकरांच्या विविध मागण्या त्यांच्यासमोर मांडण्यात आल्या.
कौन्सिलचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर, विकास कलघटगी,अरुण कुलकर्णी, बसवराज जवळी, शेवंती भाई शहा हे उपस्थित होते.
मांडण्यात आलेल्या मागण्या पुढीलप्रमाणे
#बेळगाव रेल्वे स्थानकावर एलईडी लाईट बसवा
#प्लॅटफॉर्म क्र २ व ३ साठी स्वच्छतागृहांची सोय
#गुडशेड चे तात्काळ स्थलांतरण करावे
#प्लॅटफॉर्म क्र ३ कडून नवे प्रवेशद्वार सुरू करावे.
#बहुमजली पार्किंग इमारतीचा वापर सुरू करावा.
#स्थानक आवारातील अंतर्गत रस्ते व मुख्य प्रवेशद्वार सुधारावे
#स्थानक ते आरक्षण कौंटर च्या मध्ये पाथ वे ची निर्मिती करावी
#पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधींसाठी स्वतंत्र तिकीट खिडकी उघडावी
#महिला आरपीएफ ची नियुक्ती करावी
#इलेक्टरोनिक टोकन व्यवस्था आरक्षण कक्षात सुरू करावी