डेक्कन क्रोनिकल या नामवंत इंग्रजी दैनिकाने आज एक मोठी बातमी दिली आहे. बेळगावच्या हिंडलगा कारागृहाबद्दल ही बातमी असून बराक क्र १ मधील काही कैदी खुलेआम मोबाईल वापरत असल्यावर या दैनिकाने प्रकाश टाकला आहे.
कारागृह मधील अधिकाऱ्यांना न घाबरता खुलेआम हे काम सुरू आहे. विशेष म्हणजे पैसे घेऊन हे कैदी इतर कैद्यांना बाहेर फोन करण्यास मोबाईल देत आहेत.
कारागृहात मोबाईल किंवा इतर वस्तू सापडणे काय नवीन नाही. यावेळी या बराकीत लावण्यात आलेल्या मोठ्या पोस्टर्स मागे असलेल्या खाचेत हे फोन लपवण्यात आले आहेत.
काही फोन बराकीत लपवून ठेवण्यात आले आहेत. या खाचेत फोन ठेऊन त्यावर वॅक्स लावले जाते आणि त्यावर पोस्टर लावले जाते. बीटकॉईन प्रकरणात अटक झालेल्या तीन कैद्यांनीही या फोनचा वापर केल्याचे उघड झाले आहे.
सात वाजता बराक बंद होते, त्यापूर्वी हे फोन वापरले जातात. फोन जामर च्या वेळा आणि सीसीटीव्ही याचे भान कैदी पाळतात. ही माहिती सध्या राज्यात खळबळजनक ठरत आहे.