रेल्वे उड्डाण पुलाचे काम त्वरित पूर्ण करा अशी सूचना केंद्रीय कोळसा आणि रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
शनिवारी दुपारी गोगटे सर्कल येथील नियोजित रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाची पाहणी केली त्यावेळी ते अधिकाऱ्यांशी बोलत होते.
राहुल गांधी सध्या धार्मिक यात्रेवर आहेत राज्य सरकार भ्रष्टाचारात गुंतले आहे कर्नाटकात भाजप सत्तेत आल्यास बेळगावला विशेष प्रावधान देऊन विकास केला जाईल अस देखील ते म्हणाले. रेल्वे स्थानकांचा दर्जा सुधारणे विकास करणे आणि सौन्दर्यीकरण करण्याच्या हेतूने बेळगावला आलो असल्याचे देखील ते म्हणाले.
आगामी मार्च महिन्याच्या आत उड्डाण पूल जनतेसाठी सुरु करा यासाठी अभियंते आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रयत्नशील राहावं अस गोयल यांनी म्हटलं आहे. यावेळी खासदार सुरेश अंगडी, भाजपचे किरण जाधव,राजू टोपन्नावर,रेल्वेचे अभियंते सह अधिकारी उपस्थित होते .रेल्वे स्थानक परिसरात कादाक्पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता