अबू धाबीत बंदी असलेल्या प्रदेशात फोटो काढताना अटक झालेल्या वडगाव बेळगाव येथील युवक आनंद कामकर यास अबू धाबी पोलीसा कडून चार दिवसांनी न्यायालयात हजर करणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अबू धाबीत भारतीय दूतावास कार्यालया जवळ फोटो क्लिक केल्यावर आनंद विरोधात तिथे उपस्थित अमेरिकन नागरिकांना आनंद विरोधात तक्रार नोंदवली होती त्या नंतर त्याला अटक झाली होती. शनिवारी रविवार दोन दिवस सुट्टी नंतर सोमवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय रुपये पाच हजारांचा दंड भरून घेतल्यावर त्याची सुटका केली जाऊ शकते अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
मोहम्मद अली हे कर्नाटकातील रहिवाशी सध्या अबू धाबीत वास्तव्यास असेलेले वकील आनंद ची बाजू न्यायालयात मांडणार आहेत आपल्या मुलाला सुरक्षित पोलिसांनी सोडले तर बस अशी प्रतिक्रिया आनंदचे वडील पांडुरंग कामकर यांनी बेळगाव live कडे दिली आहे.