20 वर्षीय मेकॅनिक काम करणाऱ्या युवकाला चिरडणाऱ्या अपघात ग्रस्त ट्रक जाणाऱ्या तिघांना मार्केट पोलिसांनी अटक केली आहे.
गेल्या 5 फेब्रुवारी रोजी आर टी ओ सर्कल जवळ ट्रक जाळल्याची घटना घडली होती.ट्रक जाळताना सी सी टी व्ही फुटेज तपासून ट्रक जाळनाऱ्या तिघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरिफ मुल्ला 21 रा.गोकाक, शाहबाज यरगट्टी 19 रा. वीरभद्र नगर,सलमान किल्लेदार 19 रा.वडगांव यांना अटक करण्यात आली आहे
इनायत शेख 20 रा.टोपी गल्ली हा युवक ट्रक अपघातात ठार झाला होता त्यामुळं चिडलेल्या ट्रक जाळला होता.मार्केट पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.