तेजस आणि अजिंक्य या दोन विध्यार्थ्यानी काहींही अश्यक्य नाही ये वाक्य खरे करून दाखवलं आहे.तेजस कल्लोलकर आणि अजिंक्य जोशी यांनी पहिल्या खेलो इंडिया स्कूल गेम्स मध्ये १७ वर्षा खालील गटात बॅडमिंटन स्पर्धेत कास्य पदकाची कमाई केली आहे.
५ ते ८ फेब्रुवारी दरम्यान नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडीयम मध्ये पहिल्या खेलो इंडिया स्कूल गेम्स मध्ये कास्य पदकाची कमाई करत बेळगावच्या तेजस कल्लोळकर आणि अजिंक्य जोशी या दोन विध्यार्थ्यानी इतिहास रचला आहे. या जोडीने बेळगाव शहरासाठी पहला दुहेरी स्पर्धेत पदक मिळवल आहे.
उपउपांत्यपूर्व फेरीत बेळगावच्या या जोडीने सिक्कीम च्या आंद्रे गाझमेर आणि देवनराय यांचा २१-५,२१-६, अश्या फरकानी पराभव केला होता. तर उपउपांत्य सामन्यात हरियाना च्या सीडेड खेळाडू जयंत राणा आणि सुरज सरोहा यांचा सुरुवातीला एक सेट हरून आघाडी घेत पराभव केला तर उपांत्य सामन्यात तेलंगानाच्या खेळाडू नवनीत बोक्का विष्णू वर्धन गौड यांच्या कडून ९-२१ आणि १७ -२१ या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. तेजस आणि अजिंक्य हे दोघेही एम व्ही एम इंग्लिश मेडियम शाळेचे विध्यार्थी असून राजन बॅडमिंटन अकादमी मध्ये प्रशिक्षण घेत असतात प्रशिक्षक राजन मोहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असतात
.