परीक्षेच टेन्शन घेऊन कॅम्प मध्ये राहणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास लाऊन आत्महत्त्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे.
सोमशेखर कोरीशेटटी वय १७ वर्ष रा. एन सी सी ऑफिसच्या बाजूला कॅम्प बेळगाव अस आत्महत्त्या केलेल्या युवकाच नाव आहे. सोमशेखर हा आर एल एस सायन्स कॉलेज चा पी यु सी प्रथम वर्षाचा विध्यार्थी असून सध्या त्याची परीक्षा सुरु आहे. अभ्यासाचे टेन्शन घेऊन आत्महत्या केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. कॅम्प पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे.
गेल्या आठवड्यात जी जी चिटणीस शाळेच्या विध्यार्थ्याने आत्महत्या केल्या नंतर विध्यार्थ्याने आत्महत्या केल्याची ही शहरातील दुसरी घटना आहे.