येत्या विधानसभेसाठी बेळगाव मध्ये एकीची चर्चा सुरू असताना बिदर मधील एक निष्ठावंत कार्यकर्त्याने निवडणुकीत उमेदवार निवडून आणण्यासाठी आपली एक एकर शेती विकण्याची तयारी दाखवली आहे.
बिदर म ए समिती अध्यक्ष रामराव राठोड,सदस्य किसनराव जाधव,हरिहरराव जाधव,भास्कर पटवारी तसेच इतर जण बेळगावमधे आले होते. सीमाप्रश्नी दाव्याची चर्चा करत येत्या विधानसभा निवडणुकीत रामराव राठोड वय-८० यांनी बिदरमधे (आरक्षण OBC-A) असल्याने स्वतः त्याच आरक्षणात असल्याने निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली.
तेथील इतर पक्षात विखूरलेल्या मराठी जनतेला एकत्र आणण्यासाठी आपण उमेदवारी अर्ज दाखल करण्याची इच्छा व्यक्त केली, यावेळी समिती सदस्य किशनराव जाधव यांनी माझी एक एकर शेती विकून किती पैसे येतील तेवढे खर्चासाठी घ्या.तसेच हरिहररावनीं हे उभे राहिले तर उद्या घरी गेल्यावर एक चारचाकी तसेच त्यातील डिझेल सकट निवडणूक संपेपर्यंत देतो असे म्हटले तर भास्कर पटवारीनीं मी काय करणार आहे ते तुम्ही उभे रहा मग सांगतो म्हटले.तर प्रकाश मरगाळेनी एक लाख रुपये तसेच बिदर मतदार संघात कुठेही चार सभा घ्या मध्यवर्ती अध्यक्ष दीपक दळवी सह इतर जणांना पाठवण्याची जबाबदारी माझी.असा विश्वास दिला.यामुळेच आता फक्त पाच नव्हे तर सहा आमदार निवडून येण्याची खात्री निर्माण झाली आहे.