कॅम्प येथील कॅन्टोन्मेंट कार्यकारी अधिकाऱ्याच्या बंगल्याच्या समोर असलेल्या उद्यानात महाविध्यालयीन तरुण आणि तरुणींची म्हणजेच प्रेमी युगुलांची बुधवारी दुपारी धावपळ उडाली. अचानक महिला पोलिसांनी हजर होऊन चौकशी सुरू केल्याने या युगुलांना पळून जावे लागले.
हे उध्यान फक्त महिलांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, पण तसे न होता तेथे प्रेमी मंडळींची संख्याच वाढत आहे. आडोसा असल्याने एकमेकांना चिकटून बसून नको ते चाळे सुरू झाले आहेत.
बुधवारी वातावरणातही मोड आल्याने ही जोडपी एकमेकाला चिकटून बसली होती. कुणीतरी याची खबर कॅम्प पोलिसांना दिल्यानंतर चन्नम्मा पथकाच्या महिला पोलीस व काही पुरुष पोलीस दाखल झाले. प्यार किया चोरी चोरी म्हणत एकमेकास बिलागलेल्या या जोडप्यांची तारांबळच उडून गेली होती.
या ठिकाणी फक्त महिलांना बसत यावे, वृद्ध व बालकांना बागडत राहता यावे यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाने काळजी घ्यावी अशी मागणी असून योग्य ती सुरक्षा ठेऊन प्रेमी युगुलांची संख्या कमी करण्याची काळजी घ्यावी लागेल.
Nice