बेळगाव शहराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बेळगाव महा पालिकेत मराठी सत्ता असतांना सुद्धा आणि समस्त मराठी भाषिकांची मागणी असतानाही सीमा प्रश्नाचा ठराव मांडण्यात आलाच नाही.
ही महापौर संज्योत बांदेकर,सत्ताधारी गटनेते पंढरी परब आणि किरण ठाकूर की सतीश जारकीजोळ्ळी यापैकी कोणत्या गटाचे हे नक्की नसलेल्या किरण सायनाक यांची हार ठरली आहे.
मराठे युद्धात जिंकतात आणि तहात हारतात याचा अनुभव पुन्हा एकदा समितीच्या एकही मागास उमेदवार नसलेल्या सत्ताधारी गटामुळे आला असल्याची प्रतिक्रिया सामान्य जनतेच्या तोंडातून ऐकायला मिळाली आहे.
यापुढील काळात सीमाप्रश्नाचा ठराव मांडणे आणि संमत करणे अवघड आहे. ज्या सत्ताधारी गटनेत्यांनी ज्येष्ठ नेत्याकडे बोट दाखवले त्या नेत्यांनी आदेश देऊनही ठराव केला गेला नाही, याची खंत कायम राहणार आहे.
बेळगाव live ने ठरावाचा मोठा कांगावा केला पण बेळगाव live ला आम्ही हरवले अश्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. पालिकेच्या वर्तुळात आणि मॅनेज वर्तुळात याची चर्चा होती …पण ही live आणि जनतेची हार असली तरी मनपा राजकारणात स्वाभिमानी मराठी प्रवृत्तीचाही अस्त यानिमित्ताने दिसून आला असून कमिशन खाऊ राजकारण्यांना यापुढे निवडून दिले जाऊ नये यासाठी बेळगाव live प्रयत्नशील राहणार आहे